CrimeSocial

ब्रेकिंग : सा.बां.अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थगिती

ब्रेकिंग : सा.बां.अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थगिती

जळगांव, प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या नव्या शासन आदेशानुसार, हा निर्णय दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत लागू राहील.

संदर्भानुसार, श्री. सोनवणे यांची जळगांव येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातून नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली होती. हा आदेश १८ मार्च २०२५ रोजी जारी झाला होता. मात्र, नव्या शासन आदेशान्वये (क्र. बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि. १८.०३.२०२५) ही बदली तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

शासनाने स्पष्ट केले की, हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२५०३२७१११२१२९६१८ आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.

सदर निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि अवर सचिव द. व. खारके यांच्या नावाने जारी करण्यात आला आहे. या स्थगितीमुळे प्रशांत सोनवणे हे सध्या जळगांव येथेच आपल्या पदावर कार्यरत राहतील.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button