Crime

बनावट आधार कार्ड द्वारे पुण्यात रोहिंग्याने बांधले घर

पुणे (वृत्तसंस्था )पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पुणे जवळच्या देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वत:चं घर बांधल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बांगलादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात राहिलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती.
त्यानं देहूरोड परिसरामध्ये स्वत:चं घर बांधलंय. फक्त 80 हजारांमध्ये त्यानं हे घर बांधलं. मुजम्मिलनं भिवंडीतून अवघ्या 500 रुपयांत बनावट आधार कार्ड मिळवलं.पत्नीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करुन घेतलं. पत्नीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करुन घेतलं. स्वतःसाठी आणि पत्नीसाठी पासपोर्टही मिळवला.

कोलकात्याला मनासारखं काम न मिळाल्यानं मुजम्मिल पुण्यात आला. तळेगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत त्यानं नोकरी केली. त्यानंतर त्यानं खेळण्यांचा आणि सुपारीचा व्यवसाय केला. म्यानमार आणि बांगलादेशमधून आणखी रोहिंग्यांना भारतात यायला मुजम्मिलनं मदत केल्याचा संशय आहे. तब्बल दहा वर्षं मुजम्मिल बिनदिक्कतपणे देहूमध्ये राहतोय.

जुलै 2024 मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं मुज्जमिल आणि आणखी एक रोहिंग्या सोहिद्दुल शेखला ताब्यात घेतलंय. त्या दोघांकडून सेल फोन, सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशी चलन, पासपोर्ट “मौलाना कोर्सचं” प्रमाणपत्र जप्त करण्यात आलं आहे.

रोहिंग्या मुस्लिम म्हणजे काय?

रोहिंग्या मुस्लिम हा जगातला सगळ्यात मोठा राज्य नसलेला वांशिक समूह मानला जातो म्यानमारमध्ये त्यांच्या वसाहती आहेत 1982 च्या नागरिकत्व कायद्यानुसार, म्यानमार सरकारने केवळ 40,000 रोहिंग्यांना नागरिक म्हणून मान्यता दिली. बाकीचे रोहिंगे मुस्लीम “बेकायदेशीर बंगाली” म्हणून राहिले. म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठा हिंसाचार उसळल्यानंतर 2017 पासून रोहिंग्यांचं म्यानमारमधून स्थलांतर सुरू झालं. रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशात आश्रय घेतला भारतात सुमारे 16,000 UNHCR-प्रमाणित रोहिंग्या निर्वासित आहेत मात्र भारतात अवैधरित्या राहणाऱ्या रोहिंग्यांची संख्या 50 हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button