
ग्रामीण रुग्णालयात मद्यपान करुन रुग्णांशी गैरवर्तवणुक करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आमदारांकडुन कान उघाडणी
महा पोलीस न्युज | सुभाष धाडे| मुक्ताईनगर : येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाच्या समोर सुरक्षारक्षकाने मद्य प्राशन करून गैरवर्तन केल्याच्या प्रकारावरुन या सुरक्षारक्षकास रुग्णालयातून काढून टाकण्यात आले आहे.
७ रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. ज्या महिलेशी गैरवर्तन केले, त्या महिलेच्या नातेवाईकांनी लगेचच सुरक्षा रक्षक उमेश देविदास चौधरी याची तक्रार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून केली. महाजन यांनी तत्काळ आमदार चंद्रकांत पाटील यांना फोन करून सुरक्षारक्षकाच्या गैरवर्तन संदर्भात माहिती दिली. आमदार चंद्रकांत पाटील
हे मुंबई येथून मुक्ताईनगरला पोहोचताच त्यांनी रात्री उशिरा रुग्णालय गाठत त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील पोलिसांना कळवून या कर्मचाऱ्याला पोलिसात जमा केले.
दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी सांगितले की, धुळे येथील सुरक्षा रक्षक मंडळाशी हा कर्मचारी हा संबंधित आहे. त्याला रुग्णालयातून काढून मंडळाकडे जमा करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वर्तनासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. परंतु सुधारणा न झाल्याने त्यास रुग्णालयातून काढून टाकण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकाराने रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या सुरक्षारक्षकावर कडक कारवाईची मागणी होत होती आज अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान शासकिय रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेतितेची जवाबदारी असणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असतांना मद्यधुंद होतात तरी कसे? रुग्णालय प्रशासनाचे किंवा व्यवस्थापनाचे या गंभीरपुर्ण प्रकाराकडे लक्ष का बरं नसावे? मद्यपी सुरक्षा रक्षकाची तक्रार थेट रूग्णांनाच करावी लागली असे विविध प्रश्नावल्ली जनमाणसांत निर्माण झालेली आहे






