चांदीच्या दरात दोन दिवसांत १४ हजारांची वाढ; सोन्याचे भावही उच्चांकावर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून, चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीत तब्बल १४ हजार रुपये प्रति किलोची उसळी नोंदवली गेली आहे. तर सोन्याचे दर स्थिर असले तरी उच्चांकावर टिकून आहेत.
भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजचे दर खालीलप्रमाणे आहेत.
- २२ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,१२,९५०
- २४ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,२३,३००
- चांदी प्रति किलो – ₹१,७०,०००
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे ₹१,००० ते ₹१,५०० इतकी वाढ नोंदवली गेली आहे. मात्र चांदीच्या दरातील वेगवान वाढ ही बाजारपेठेतील मुख्य चर्चेचा विषय ठरली आहे. तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक मागणी, सणासुदीची खरेदी आणि जागतिक दरातील चढ-उतार यांचा परिणाम म्हणून चांदीचे भाव आणखी वाढू शकतात.
दिवाळी, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने भंगाळे गोल्ड मध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे. आकर्षक दागिने, शुद्धतेची हमी आणि विविध ऑफर्समुळे नागरिक या काळात सोन्या-चांदीची खरेदी करत आहेत.
भंगाळे गोल्डचे दररोज अपडेट होणारे दर जळगाव आणि सावदा येथील ग्राहकांना विश्वासार्ह मार्गदर्शन देतात. आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी योग्य वेळी निर्णय घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.




