Other

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते फेसबुक दिंडीच्या नव्या गीताचे पोस्टर व टीझरचे अनावरण

'रामकृष्ण हरी, जय शिवराय' गीतातून भक्ती आणि शिवशक्तीचा अनोखा संगम; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते फेसबुक दिंडीच्या नव्या गीताचे पोस्टर व टीझरचे अनावरण

‘रामकृष्ण हरी, जय शिवराय’ गीतातून भक्ती आणि शिवशक्तीचा अनोखा संगम; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बारामती | प्रतिनिधी

फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या बहुप्रतिक्षित नव्या गीताचे पोस्टर आणि टीझरचे अनावरण महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितराव पवार यांच्या हस्ते बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याला फेसबुक दिंडीची संपूर्ण टीम उपस्थित होती.

भक्तीशक्तीची अनोखी संकल्पना

यंदाच्या गीताचे शीर्षक “रामकृष्ण हरी, जय शिवराय” असे असून, भक्तीशक्ती ही आगळीवेगळी संकल्पना या गीतातून साकारण्यात आली आहे. वारकरी संप्रदायातील भक्तीभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी शिवशक्तीचा संगम या गीतात अनुभवायला मिळणार आहे. भक्ती, पराक्रम, संस्कार आणि प्रेरणेचा सुंदर मिलाफ या गीतातून रसिकांसमोर येणार आहे.

दिग्पाल लांजेकरांची लेखणी, अवधूत गांधींचे संगीत

या गीताचे बोल सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहेत. गीताला लोकप्रिय गायक अवधूत दादा गांधी आणि प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने यांनी स्वर दिले आहेत. संगीत दिग्दर्शनाची धुरा देखील अवधूत गांधी यांनी सांभाळली असून, त्यांच्या संगीतामुळे गीताला वेगळी ऊर्जा आणि भावस्पर्शी उंची लाभली आहे.

‘छोटा वारकरी’ची विशेष उपस्थिती

या सोहळ्यात फेसबुक दिंडीचा लाडका चेहरा ‘छोटा वारकरी’ विशेष आकर्षण ठरला. तसेच फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्यासह पूजा मोरे, वारी मोरे, वैष्णव मोरे, सुमित चव्हाण आणि शिवम कदम उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांचे कौतुक

यावेळी मा. सुनेत्राताई पवार यांनी संपूर्ण गीत लक्षपूर्वक ऐकत त्यातील संकल्पना, प्रभावी शब्दरचना, संगीत आणि सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. हे गीत भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संदेश देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लवकरच यूट्यूबवर प्रदर्शित

फेसबुक दिंडीचे हे नवे गीत लवकरच त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार असून, वारकरी, शिवभक्त आणि संगीतप्रेमींसाठी ही एक प्रेरणादायी संगीतमय मेजवानी ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button