Gold-Silver Rate | सोने स्थिर, चांदीत सलग उसळी; ग्राहक व गुंतवणूकदारांची वाढती उत्सुकता

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमी व गुंतवणूकदारांसाठी गेले काही दिवस सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसले. मात्र, आठवड्याच्या अखेरीस सोन्याचे दर स्थिर झाले असून, चांदीने मात्र गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊया. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्डच्या भव्य दालनात आकर्षक दागिने आणि शुद्ध सोन्याची हमी उपलब्ध आहे.
गेल्या आठवड्याचा आढावा घेतला असता ६ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोनं ₹१,०७,८०० प्रति तोळा होतं. ९ सप्टेंबरला सोनं झेपावत ₹१,०९,७०० वर पोहोचले. १२ सप्टेंबरला दरात थोडी वाढ होऊन ₹१,१०,२०० झाला. मात्र, १३ व १४ सप्टेंबरला सोनं स्थिर राहून ₹१,१०,००० प्रति तोळा या दरावर स्थिरावले. म्हणजेच आठवडाभरात सोन्याने सुमारे ₹२,२०० ची वाढ घेतली, पण अखेरीस दर स्थिरावले.
दरम्यान, चांदीत गेल्या आठवड्यात लक्षणीय उसळी दिसून आली. ६ सप्टेंबरला चांदी ₹१,२४,५०० प्रति किलो होती. ९ सप्टेंबरला ती ₹१,२६,००० वर पोहोचली. १२ सप्टेंबरपर्यंत दर झपाट्याने वाढून ₹१,२८,५०० झाला. अखेरीस १४ सप्टेंबरला दर ₹१,२९,५०० इतका झाला. म्हणजेच आठवडाभरात चांदीने तब्बल ₹५,००० ची उसळी घेतली आहे.
गणेशोत्सव संपताच सोन्याचे दर एकीकडे स्थिरावले असले तरी चांदीतील वाढ ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. या वाढीमुळे अनेक गुंतवणूकदार चांदीकडे वळत असल्याचे दिसत आहे. दररोज बदलणारे भाव, आकर्षक डिझाईन्स, सर्वोत्तम ऑफर्स आणि शुद्धतेची हमी यामुळे जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड हे सुवर्णप्रेमींचे पहिले पसंतीचे ठिकाण ठरत आहे.




