Politics
जय श्रीराम, गोमाताकी जय म्हणत अमोल जावळेंनी घेतली आमदारकीची शपथ

रावेरः नुकत्याच पार पडलेल्या रावेर यावल विधान सभेच्या निवडणुकीत आज पर्यन्त निवडून आलेल्या आमदारांपेक्षा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले भाजपा चे उमेदवार अमोल जावळे यांनी दि. ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे समोर आमदारकीची शपथ घेतली.
त्यांनी शपथ घेताना पहिल्यांदा आपल्या पायातील चप्पल काढली आणि शपथ घेताना मात्र आवर्जून त्यांनी सुरुवातीला जय श्रीराम, गोमाता की जय अशी घोषणा देत शपथ घेतली यावरून त्यांची विधानसभा व विधानभवनाची गरीमा राहण्याची सुसंस्कृतपणाची झलक त्यावेळेस दिसून आली.