Crime

अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार इम्रान शेख हद्दपार

अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार इम्रान शेख हद्दपार

अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या इम्रान शेख सलीम (वय २७, रा. शाह आलम नगर, अमळनेर) याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग यांनी आदेश जारी केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय निकम यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला.

यामध्ये इम्रान शेख सलीम याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्यामार्फत सादर करण्यात आला होता.

प्रस्तावाची पडताळणी आणि संबंधित गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग यांनी इम्रान शेख सलीम याला सहा महिन्यांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला.

या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार असून, आगामी काळातही अशा व्यक्तींवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरात वारंवार गुन्हेगारी कृत्ये करून अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची बारकाईने नजर राहणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कडक आणि प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button