आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा कोजागिरी उत्सव जल्लोषात साजरा

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा कोजागिरी उत्सव जल्लोषात साजरा
जळगाव प्रतिनिधी आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा कोजागिरी पौर्णिमा उत्सव 14 ऑक्टोंबर 2025 रोजी महेश प्रगती मंडळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात माता लक्ष्मीच्या आगमनाने झाली. डॉ. सोनाली मंत्री, सुनंदा लाठी, तृप्ती काबरा व इतर सदस्यांनी आकर्षक नृत्यप्रस्तुतीद्वारे मातेचे स्वागत केले.
यानंतर रंगतदार गरबा स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून ज्योती श्रीवास्तव व भावना सोमानी यांनी काम पाहिले.
गरबा क्वीन — वैशाली मुंदडा व रेणू मणियार,
बेस्ट ड्रेस — आरती काबरा व अश्विनी मुंदडा,
बेस्ट कपल — तृप्ती काबरा–अनुराधा लाहोटी आणि पूजा मुंदडा–भाग्यश्री काबरा ठरल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जाजू व डॉ. पूनम मंत्री यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्मला जाखटे, शालमली बिर्ला, मोना बलदवा, रेखा मंत्री, रंजनी मंडोरा, नीलिमा धुप्पड आणि सुलभा छापरवाल यांनी परिश्रम घेतले.
समारोप स्वादिष्ट भोजन व दुधापानाने झाला.
कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा, सचिव, संचालिका व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती






