ईद-ए-मिलाद निमित्त अमळनेरमध्ये रक्तदान शिबिर; अनेक मान्यवरांची उपस्थिती

ईद-ए-मिलाद निमित्त अमळनेरमध्ये रक्तदान शिबिर; अनेक मान्यवरांची उपस्थिती
अमळनेर पंकज शेटे : ईद-ए-मिलादच्या पवित्र दिनाचे औचित्य साधत येथील कसाली मोहल्ला (रजा ग्रुप) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सुमारे 250 रक्तदातानी रक्तदान केलं . राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार शिरीषदादा चौधरी, अमळनेर पोलीस स्टेशनचे डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम, तसेच सिंधू दादा, माजी नगरसेवक फिरोज पठाण आणि सलीम टोपी, शहर अध्यक्ष मुख्तार खाटिक आणि माजी नगरसेवक शेख हाजी उपस्थित होते.

यासोबतच काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा सो आणि सुरेश अर्जुन पाटील, गुलाम नबी पैलवान, आरिफ पठाण, इम्रान भाई शेख, हाजी दबीर पठाण, अमीर खां मिस्त्री यांच्यासह अनेक स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन इम्रान खाटिक यांनी केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळणार आहे.






