भडगाव : नगराध्यक्षपदासाठी २ तर नगरसेवकपदासाठी १८ अर्ज दाखल

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहाव्या दिवशी अखेर मुहूर्त लागला आहे. आज लोकनियुक्तसाठी दोन तर नगरसेवक पदासाठी अठरा अर्ज दाखल असून शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रेखा मालचे व अपक्ष उमेदवार असे नगराध्यक्ष पदाकरता दोन अर्ज दाखल झालेले असून पुढील दोन दिवसात किती अर्ज दाखल होतात
निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख लढती आणि उमेदवारीबाबत शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलट यांच्या प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. मात्र, सुरुवातीचे तीन दिवस एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. आज अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी दाखल केलेले अर्ज तारखेनुसार पुढील प्रमाणे दि.१३ नोव्हेंबर २०२५ नगरसेवक पदकरिता, प्रभाग क्र.८-ब पाटील अमोल नाना, दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरसेवक पदकरिता प्रभाग क्र. ८-अ पाटील पुनम प्रशांत २ अर्ज, प्रभाग क्र. ९-ब पाटील योजना दत्तात्रय, प्रभाग क्र. १-ब पाटील संतोष अर्जुन, प्रभाग क्र. ११-ब भोई पुष्पाबाई अशोक, दि.१५ नोव्हेंबर नगराध्यक्षा पदकरिता मालचे रेखा प्रदीप (शिवसेना), मालचे लताबाई अजय (अपक्ष), नगरसेवक पदकरिता
प्रभाग क्र.१-अ मालचे लताबाई अजय (भाजपा),प्रभाग क्र. १-ब नरवाडे गणेश काशीनाथ (शिवसेना), प्रभाग क्र. ६-ब पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना),प्रभाग क्र.७-अ परदेशी नीता गणेश (शिवसेना), प्रभाग क्र. ७-ब शेख खलील शेख अजीज (शिवसेना), प्रभाग क्र.८-अ पाटील समीक्षा लखचंद (शिवसेना),
प्रभाग क्र. १०-अ पाटील विठ्ठल कौतिक (भाजपा), प्रभाग क्र. १०-अ पाटील जितेंद्र शांताराम (शिवसेना), प्रभाग क्र. १०-ब पाटील ज्योति जितेंद्र (शिवसेना), प्रभाग क्र.११-अ अहिरे देवाजी बापू (शिवसेना), प्रभाग क्र. ११-ब भोई कल्पनाबाई जगन (शिवसेना) असे अर्ज कालपर्यंतचे व आजचे मिळून एकूण नगराध्यक्षा पदाकरिता उमेदवार २ नगरसेवक पदाकरिता उमेदवार १८ इच्छुकांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केलेले आहे तरी येणाऱ्या दोन दिवसात बरेचसे इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळेस प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष यंदाची भडगाव नगरपरिषद निवडणूक खास आकर्षण ठरत आहे. कारण यावेळेस भडगाव नगरपरिषदेचा नगराध्यक्ष प्रथमच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षाची निवड केली जात होती. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने शहरातील मतदारांना प्रत्येकी दोन नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी एक, असे एकूण तीन मते देता येणार आहेत. शहरातील १२ प्रभागातुन २४ नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.






