स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव
नवी दिल्ली,स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड विंटर गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी त्यांचे कौतुक करून गौरव केला.मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, “भारतीय खेळाडूंनी जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या दृष्टिकोनातून दिव्यांग खेळाडूंना मोठा पाठिंबा मिळत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताच्या कामगिरीत सातत्याने वाढ होत आहे.”
भारताची ऐतिहासिक पदककामगिरी:
भारतीय संघाने एकूण ३३ पदकांची कमाई केली, ज्यात अंतिम दिवशी ११ पदके मिळाली.
स्नोशूईंगमध्ये वसू तिवारी, शालिनी चौहान आणि तान्या यांनी २५ मीटर इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. जहांगिरने कांस्यपदक पटकावले.
अल्पाईन स्कीइंगमध्ये राधा देवी आणि प्रेरणा देवी यांनी सुवर्णपदक, तर अभिषेक कुमारने नॉक्स स्लालममध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.
राज्यमंत्री खडसे म्हणाल्या की, भारत सरकारने ११ राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून, खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रवास, निवास आणि पोषण आहार उपलब्ध करून दिला. त्यामुळेच खेळाडूंनी जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
या कार्यक्रमाला स्पेशल ऑलिम्पिक्स भारताचे अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा, महासंचालक डॉ. अविनाश चौधरी, क्रीडा सचिव श्री. के. डी. महेंद्र, तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.