ब्रेकिंग : जळगाव एलसीबीत १३ कर्मचाऱ्यांची वर्णी, वाचा नावे..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेत (स्थागुशा) नेमणुका करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय सोयीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या निकडीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उपविपोअ अधिकारी/पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर त्याठिकाणी नवीन नियुक्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर महिन्याभराने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी १३ कर्मचाऱ्यांची त्याठिकाणी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे त्यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नेमणूक झालेल्या १३ कर्मचाऱ्यांची नावे
प्रशांत रमेश परदेशी, एमआयडीसी, उमाकांत पन्नालाल पाटील: उविपोअ भुसावळ, राहुल विनायक वानखेडे, भुसावळ बाजारपेठ, मयूर शरद निकम, निंभोरा, सचिन रघुनाथ घुगे: रावेर पोस्टे, प्रेमचंद वसंत सपकाळे: वरणगांव, राहुल चंद्रकांत रगडे: एमआयडीसी, विकास मारोती सातदिवे: एमआयडीसी, छगन जनार्दन तायडे: एमआयडीसी, रत्नहरी धोडीराम गिते: एमआयडीसी, सलीम सुभान तडवी: जिल्हापेठ, गोपाल उखडू पाटील: पो.मु. जळगाव कामकाज उविपोअ जळगाव उपविभाग, रावसाहेब एकनाथ पाटील: चोपडा ग्रामीण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.