Crime
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर महसूलच्या ताब्यात

भडगाव | सागर महाजन – तालुक्यातील भोरटेक येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना. अवि संजय पाटील याचे मालकीचे एक टाटा ९०९ टिप्पर वर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे टीप्पर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दिली.ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ग्राम महसूल अधिकारी व्ही.सी.पाटील,विलास शिंदे,मांडोळे,अविनाश जंजाळे, बैरागी,शितल राजपूत,महसूल सेवक -नितीन मोरे व कविता सोनवणे आदींच्या पथकाने कारवाई केली.