Other

सामूहिक वनहक्क क्षेत्रात उभी राहणार हरित वनराई

सामूहिक वनहक्क क्षेत्रात उभी राहणार हरित वनराई

चोपडा, रावेर व यावल तालुक्यात मोठ्या वृक्षलागवडीचे नियोजन; रोजगारासह पर्यावरण संवर्धनाला चालना

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा, रावेर आणि यावल तालुक्यातील सामूहिक वनहक्क (CFR) क्षेत्रांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार असून त्यासाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. उपवनसंरक्षक, यावल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पर्यावरण संवर्धनासोबत आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावल येथील उपवनसंरक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर व रावेर येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा Pratibha Shinde, सचिनदादा धांडे, रोजगार हमी योजनेचे APO व TPO, वनहक्क कक्षाचे तालुका व्यवस्थापक व सहाय्यक तसेच जिल्हा परिषद जळगाव येथील सहाय्यक गटविकास अधिकारी यांनीही सहभाग नोंदविला.

बैठकीत सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व्यापक वृक्षलागवड मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. यामधून वनक्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि ग्रामीण भागातील पर्यावरणीय संतुलन मजबूत करणे यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.

“हरित वन – समृद्ध गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासोबतच ग्रामीण विकास आणि रोजगारनिर्मितीस चालना देणारे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button