Other

अमळनेर येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा

अमळनेर येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा

अमळनेर I प्रतिनिधी

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर विधानसभा निहाय “शिवसंवाद दौरा” आयोजित करण्यात येत असून, शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याचा दौरा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिडटाऊन येथे अमळनेर, जळगाव ग्रामीण व चोपडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.  गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना. श्दादाजी भुसे, शिवसेना संपर्कमंत्री धुळे श्भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव शआनंद परांजपे, माजी खासदार व जळगाव संपर्कप्रमुख आ. दिलीप मामा लांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसंवाद दौऱ्यामध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, संघटनात्मक कार्य करताना येणाऱ्या अडचणी तसेच आगामी काळातील संघटन बळकटीकरणाबाबत चर्चा करून विविध प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तरी अमळनेर तालुक्यातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री. गुलाब पाटील यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button