Social

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान जळगाव दौऱ्यावर

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या जळगाव जिल्हा परिषद भेटीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा परिषद मुख्यालयातील वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती बैठकीत घेण्यात येणार आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची सद्यस्थिती तपासण्यात येणार आहे.

याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विभागांकडून माहिती घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button