सुकळी येथे ‘पंचायत राज अभियानातर्गत’ वनराई बंधाऱ्याची निर्मिती!

सुकळी येथे ‘पंचायत राज अभियानातर्गत’ वनराई बंधाऱ्याची निर्मिती!
मुक्ताईनगर प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातर्गत’ तालुक्यातील सुकळी येथे ग्रामपंचायत अधिकारी गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. जंगलातुन वाहत येणाऱ्या ओढ्यावर अगदी गावाशेजारी या ओढ्यावर सिमेंटच्या खाली गोण्यात वाळु भरुन सदर गोण्या भींतीसारख्या रचण्यात आल्या.
परीसरातील पावसाळ्यातील वाहत जाणारे पाणी अडवुन जमिनीत जिरवले जाते.दरम्यान अशा बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास हातभार लागतो. ग्रामस्थांनी जेथे शक्य होईल तेथे अशा पद्धतीने वनराई बंधाऱ्यांची स्वतः श्रमदाने उभारणी करावी.यासह जलसंवर्धनाचे महत्व पटवुन देत संवर्धन व जतन याविषयी माहीती ग्रामविकास अधिकारी गोविंद राठोड यांनी उपस्थितांना दिली.
तसेच गावातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याना त्यांच्या हक्काचा शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी बोलतांना दिले.सुकळी ग्राम पंचायतीस पदभार स्वीकारलेले प्रशासकीय अधिकारी गोविंद राठोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत यापुर्वीच वृक्षलागवडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.तसेच स्वच्छतेबाबतची अनेक विकासकामे केली. सुटीच्या दिवशी पण गावात हजर राहुन लोकांच्या समस्येनुसार ग्रामनिधी खर्च केला.यामुळे ते अल्पावधीतच गावकऱ्यांना लोकप्रिय झाले.
यावेळी सुकळी ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, नंदकुमार नमायते,सदस्या सिमा पाटील,शारदा कोळी,प्रियंका पाटील, ग्रा कर्मचारी रविंद्र कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






