Crime

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई: ‘चेन स्नॅचर’ जेरबंद

भुसावळ: अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या (साखळी चोरी) गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB Pathak) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी सादिक अली हा महाराष्ट्रभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता.

कारवाईचा तपशील:

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सादिक अली याच्या ठावठिकाण्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.

अनेक जिल्ह्यांत होता ‘मोस्ट वॉन्टेड’:

तपासादरम्यान समोर आले आहे की, आरोपी सादिक अली याने राज्याच्या विविध भागांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. तो खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये फरार होता:

• जळगाव जिल्हा: जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण.

• इतर जिल्हे: वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर.

तपास पथक:

सदरची कामगिरी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील:

• हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले,चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांचा समावेश होता.

या कुख्यात गुन्हेगाराच्या अटकेमुळे चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस प्रशासन या कारवाईबद्दल पथकाचे कौतुक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button