Crime
डोमगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

डोमगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी): डोमगाव (ता. जळगाव) येथील ३८ वर्षीय शेतकरी किशोर आसाराम धनगर याने कर्जाच्या तणावाखाली आणि दुबार पेरणीच्या संकटामुळे सोमवारी (७ जुलै) दुपारी २:३० वाजता म्हसावद रेल्वे गेटजवळ पुष्पक एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली
.किशोर यांच्या पश्चात आई, पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस नाईक हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.