PoliticsSocial

भडगाव येथे भव्य रक्तगट तपासणी शिबिर व पुरस्कार वितरण

भडगाव येथे भव्य रक्तगट तपासणी शिबिर व पुरस्कार वितरण

भडगाव:- प्रतिनिधी तालुक्यातील बांबरूड बु येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य रक्तगट तपासणी शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुपडू खेडकर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक युवराज पाटील, गटनेता लखीचंद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील पाटील, प्रदिप मालचे, शिक्षक सेना अध्यक्ष यशराज निकम शिवव्याख्याते सुनिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, विस्तार अधिकारी अशोक खैरनार, ग्रामपंचायत अधिकारी आर. बी. पाटील, पोलीस पाटील निळकंठ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. किशोर पाटील, गायन-कला क्षेत्रात सचिन बागुल, शाहिरी कला क्षेत्रातील परशुराम सूर्यवंशी, देशसेवा क्षेत्रात रविकांत सूर्यवंशी, सामाजिक क्षेत्रात आबासाहेब पाटील, शैक्षणिक क्षेत्रात डॉ. तेजश्री पाटील तसेच महावितरण सेवेसाठी मनोज बाविस्कर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बी.एस.एफ. मध्ये कार्यरत असलेल्या ऋषिकेश पाटील, आर्मी जवान हर्षल पाटील, आर्मी जवान शिवम पाटील, ॲड.दिपाली सूर्यवंशी नुकतेच सेवानिवृत्त झालेले एस. पी. पाटील, रेखा वाल्हे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी आयोजित रक्तगट तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिद्धी विनायक पॅथॉलॉजी लॅबच्या सौजन्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी रक्तगट तपासणीचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खेडकर आण्णा मित्र मंडळ तसेच बांबरूड बु!! येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, नागरिक व विद्यार्थ्यांमुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुधाकर सोनवणे यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button