व्यापाऱ्याला 25 लाखात गंडविले ; दोन जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : -विश्वासाने दिलेला धनादेश चा गैरवापर करून एका व्यापाऱ्याची 25 लाख 5 हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की
भुसावळातील टेमी व्हिला येथे अदिल रूसी कविना (वय ५७) हे आपल्या कुटुंबीयासह राहायला असून त्यांच्या परिचयातील कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिरवार्ड, भुसावळ) या दोघांना त्यांनी
विश्वासाने दोन धानदेश दिले होते. या दोघांनी २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर दरम्यान या काळात संगनमताद्वारे १ लाख १५ हजार आणि २३ लाख ९० हजार ६०० रूपयांचे वेगवेगळे धनादेश परस्पर खात्यात वर्ग करून त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत दोघांविरुद्ध तक्रार देत जुना दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.