Social

अमळनेरमध्ये ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ एसटी विनंती थांबा बोर्डाचे अनावरण

अमळनेरमध्ये ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ एसटी विनंती थांबा बोर्डाचे अनावरण

युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मनीष  चौधरी यांच्या पुढाकारातून प्रवाशांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) : मंगळग्रह मंदिर परिसरातील भाविक व नागरिकांची एसटी बस थांब्याअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मनीष हरिश्चंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ (एसटी विनंती थांबा) या अधिकृत फलकाचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांसह मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एसटी बसची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. नागरिकांना हक्काचा बसथांबा मिळावा, या उद्देशाने मनीष हरिश्चंद्र चौधरी यांनी विशेष पाठपुरावा करून हा उपक्रम साकारला.

यावेळी मोहन मनोरे, महेंद्र साळुंखे, रामकृष्ण चिंतामण पाटील (देवरे), राजेंद्र बाळकृष्ण जाधव, नागोराज राजाराम धनगर, अमोल नागोराज धनगर, हितेश चौधरी आणि इंजि. निखिल चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या एसटी विनंती थांब्यामुळे परिसरातील प्रवासी व भाविकांना बससाठी दूरवर जावे लागणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या या जनहिताच्या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी मनीष  चौधरी व सहकाऱ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button