Crime

भडगावात पेट्रोल पंपावर थरार! नियंत्रण सुटलेला डंपर थेट डिझेल मशीनवर धडकला

भडगावात पेट्रोल पंपावर थरार! नियंत्रण सुटलेला डंपर थेट डिझेल मशीनवर धडकला

भडगाव (:प्रतिनिधी) भडगाव-पाचोरा रोडवरीलपेट्रोल पंपावर डिझेल येणार असल्याच्या माहितीनंतर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली असताना अचानक एका डंपर  चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपरने थेट डिझेल भरण्याच्या यंत्रालाच जोरदार धडक दिली. या धडकेत यंत्र जागेवरून उखडून फेकले गेले असून त्याचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली.

सोमवारी भडगावातील या पंपावर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी अचानक डंपरचा ताबा सुटल्याने तो थेट डिझेल भरणाऱ्या यंत्रावर जाऊन आदळला.धडकेचा आवाज होताच परिसरात एकच घबराट पसरली. उपस्थित वाहनधारक व नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केल्याचे सांगण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर परिसरात नागरिक व वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या प्रकरणी उशिरापर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button