गुढे येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे भूमिपूजन.

गुढे येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे भूमिपूजन.
भडगाव प्रतिनिधी
पाचोरा भडगाव मतदार संघांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करीत तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण प्रमुख मान्यवरांसह करण्यात आले.
मागील काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव येथे रिपाई आठवले गटाचे चे भडगाव तालुका अध्यक्ष तथा बांबरुड बुद्रुक चे प्र सरपंच एस.डी.खेडकर आण्णा यांनी आयोजित केलेला सामाजिक हित संवाद मेळाव्यात गाव तेथे विहार व सभामंडप ही रास्त मागणी घेऊन आप्पा साहेब यांनी दिलेला शब्द पाळून गुढे गावात विहाराचे भूमिपूजन केले व समाजासाठी विकास करण्यासाठी मागे हटणार नाहीं या सोबतच विहाराला लागूनच एक सभामंडप घेऊन त्यात बौद्ध समाजातील मंगल परिणय साठी वधू वर साठी दोन स्वतंत्र रूम करून भव्य दिव्य असे विहार दिसेल त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाबत बाबासाहेब यांच्या विचाराला साजेल एवढा उंच पुतळा भविष्यात उभारला जाईल त्या मुळे निधी कमी पडू देणार नाहीं असे समाज बांधवांना आश्वासित केले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करून समाज बांधवानी समाधान व्यक्त केले. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख मान्यवर समन्वय समितीचे माजी अध्यक्ष युवराज आबा पाटील, माजी शिक्षण सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघांचे सभापती भैयासाहेब पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती पि.ए. पाटील,रिपाई आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा बांबरुड बुद्रुक चे प्र सरपंच एस डी खेडकर आण्णा, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख स्वप्नील पाटील, युवा सेना प्रमुख जगदीश पाटील, पिंप्रीहाट सरपंच दिपक मोरे, वैध्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील, गुढे सरपंच हर्षल माळी,माजी जि प सदस्य संजय पाटील,माजी प स सदस्य लालचंद परदेशीं, पाटोळे बापु, नगराज पाटील,पत्रकार संजय मोरे, धनंजय माळी, रिपाई चे पदाधिकारी भाऊसाहेब केदार, अनिल केदार, देवा बाविस्कर, मनोज सोनवणे, किरण मोरे, दिपक मोरे, विकास भालेराव, सचिन सोनवणे, संजय पगारे, बापु बाविस्कर,यांच्या सह पंच क्रोशीतील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर सोनवणे सर यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार रिपाई आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी रिपाई तालुका उपाध्यक्ष प्रवीण जाधव, सुनिल पटाईट, रवींद्र मोरे, अनिल मोरे,प्रकाश बागुल, नाना मोरे, नाना गिरधर, भाऊसाहेब मोरे, हेमराज मोरे, वाल्मिक बागुल, युवराज वाल्मिक, अंबु मोरे, भगवान ब्राम्हणे, आबा मोरे, भगवान मोरे आण्णा मोरे, सचिन जाधव, गौतम शिरसाठ, धनराज मोरे, समाधान मोरे, आबा अशोक मोरे, किरण मोरे, समाधान उत्तम मोरे यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.






