भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन

भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन
जळगाव | प्रतिनिधी
जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे, आदिवासी समाजात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे तसेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारे महान क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त सोमवारी (दि. ९ जून) भारतीय जनता पक्षाच्या जीएम फाउंडेशन येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महापौर दीपमाला काळे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा, सामाजिक जागृतीसाठी केलेले कार्य आणि अन्यायाविरुद्ध उभारलेला संघर्ष यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी राहुल वाघ, नितीन इंगळे, उदयजी भालेराव, राजेंद्र मराठे, मिलिंद चौधरी, मनोज भांडारकर, दीपक कोळी, नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, संजय नारखेडे, महेश चौधरी, नितीन पाटील, जितेंद्र चव्हाण, महेश कापुरे, मुकेश कुकरेजा, विठ्ठल पाटील, तुषार सूर्यवंशी, हर्षल सोनवणे, भूषण काकडे, किरण भोई, युवराज सपकाळे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





