Other

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत सख्ख्या बहिणी गुणवत्ता यादीत

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत सख्ख्या बहिणी गुणवत्ता यादीत

भडगाव (प्रतिनिधी)

शालेय वयातील बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळावा तसेच राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्याविद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भडगाव तालुक्यातील जुने वडधे येथील हॉटेल व्यावसायिक लहूसिंग शिवसिंग पाटील यांच्या कन्या कु. आरुषी लहूसिंग पाटील (इयत्ता पाचवी) व कु.प्रांजल लहूसिंग पाटील (इयत्ता आठवी) या दोन्ही सख्ख्या बहिणींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थिनी या महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी
आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मानद सचिव, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच भडगाव व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनीही विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या यशासाठी विद्यार्थिनींना गणेश नारायण पडसरे व परीक्षा समन्वयक आर. आर. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button