Other

कंडारी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीला भेट

कंडारी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीला भेट

वृक्षारोपण करून विविध सुविधांची केली पाहणी

जळगाव/प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार दि २२ जून रोजी जळगाव तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंगणवाडी केंद्रात त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची माहिती घेतली. पोषण आहाराची गुणवत्ता, नियमित वितरण तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. तसेच शाळेतील शैक्षणिक व मूलभूत सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार, स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

ग्रामपंचायत कार्यालयात महाऑनलाईनद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांच्या सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना आवश्यक दाखले व सेवा वेळेत, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या गाव नमुना क्रमांक ८ व ९ या नोंदींचीही पाहणी करण्यात आली. सर्व अभिलेख व नोंदी अचूक, अद्ययावत आणि व्यवस्थित ठेवाव्यात, तसेच ग्रामस्थांना आवश्यक माहिती व सेवा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी केले.

या भेटीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button