Crime

ब्रेकींग : जळगावात २ सट्टा पेढी लुटल्या, बंदूक, चाकूचा धाक?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ आणि अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या सट्टापेढीवर तीन अज्ञात चोरट्यांनी बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, अवैध धंदा असल्याने याप्रकरणी पोलिसात अद्याप कोणतीही नोंद नसल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेल्या एका रोलेट गेम (चकरी) च्या अड्ड्यावर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तीन तरुण गेले होते. गर्दी असल्याने त्यांनी तिथून काढता पाया घेत जवळच असलेल्या वाईन शॉपवरून मद्य घेत प्राशन केले. ११ वाजेच्या सुमारास सट्टा पेढीवर जात तिघांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील २५ ते ३० हजाराची रोकड लुटून नेली.

बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या एका सट्टा पेढीवर पुन्हा त्याच तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ४० ते ५० हजारांची रोकड चोरून नेली आहे. चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीने आलेले होते आणि त्यातील दोघांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता कुणीही तक्रारदार आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले तर काही पोलिसांनी सट्टा चालकांकडून माहिती घेतली असल्याचे समजते.

दोन वर्षापूर्वी देखील जळगाव शहरात असेच प्रकार घडत होते मात्र अवैध धंदे असल्याने कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते. काही वर्षापूर्वी देखील रावेर ते यावल दरम्यान असेच प्रकार सुरू होते. एका प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा देखील दाखल केला होता. दोन दिवसात घडलेल्या घटनांची अद्याप पोलिसांनी पुष्टी केली नसली तरी या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस पुढे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button