माविमच्या प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

माविमच्या प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजना व स्वयंरोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन
चोपडा | प्रतिनिधी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जळगाव जिल्हा कार्यालयांतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी), चोपडा यांच्या वतीने १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (२०२५-२६) गुरुवार, ९ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे होते. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या मनीषा पाटील, जयश्री पाटील, मीनाक्षी कोळी, नलिनी शिरसाठी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक धीरज मुलदानी, एचडीएफसी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक अकबर बेपारी, एफपीसी प्रायमोचे प्रवीण चौधरी, क्रिस्टल फाउंडेशनचे विजय सोनवणे व विनोद तावडे, तसेच विठ्ठल अॅग्रोचे पवन चौधरी व अनिकेत पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी महिला बचत गटांचे सक्षमीकरण, शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, उद्योजकता आणि विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी माविम जळगाव जिल्हा कार्यालयाचे सुमेध तायडे (डीसीओ), युवराज पाटील (सल्लागार) आणि परेश गडे (एओ) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना खैरनार यांनी केले. युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन सलीम तडवी यांनी केले. वैशाली पाटील यांनी आभार मानले. नवनिर्वाचित सीएमआरसी अध्यक्षा निर्मला पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सचिव व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने सभेचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूनम पाटील, राजश्री पाटील, शितल पाटील, सुनिता पाटील, चंद्रमा राजपूत, मनीषा सैंदाणे तसेच सर्व सीआरपी यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेला महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





