२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली
सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात मेणबत्त्या पेटवून अभिवादन
जळगाव (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांसह देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस अधिकारी आणि जवानांना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नागरिकांनी दहशतवाद आणि पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहून शहीद नागरिक आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व जवानांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, राहुल चौधरी, हाजी शकूर बादशाह, हाजी अकबर अली, हाजी शेख सलीमउद्दीन, हाजी अब्दुल रहीम, नितीन शिंपी, योगेश मराठे, शफी शेख, रवींद्र खैरनार, यासिन कुरेशी, अब्दुल रहेमान, युसूफ नागोरी, अझीझ इब्राहिम, मोहसीन कुरेशी, मुकेश सेठीया, शेख रमजान, फैझान रहेमान, मोहम्मद नईम, परिमल मजुमदार, मोईन कुरेशी, जावेद बागवान, अयान अलीम, झिशान हुसैन, अशफाक खान, जावेद अय्युब, अब्दुल्लाह बशीर, वसीम अहमद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







