Crime

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम

 जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम

चार दिवसांत २० गुन्हे दाखल; १५ आरोपी ताब्यात, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर| प्रतिनिधी

पुणे येथे गावठी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यातील चोपडा , अमळनेर ,धरणगाव, पारोळा  या ततालुक्यांमध्ये विशेष धडक मोहीम राबवून अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. दि. १ जून ते ४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २० गुन्हे नोंदविण्यात आले असून १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान आरोपींकडून तब्बल ७,४१० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, २०० लिटर ताडी तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ६० हजार ७९५ रुपये इतकी असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

ही कारवाई चोपडा विभागातील चिखलोत शिवार, शेळावे शिवार, गांधली, कलाली, सावखेडा, हिंगोली बुद्रुक, सुटकार आणि अडावद परिसरात करण्यात आली. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विभागाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मोहिमेत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, एन. पी. खपके, आर. के. फुसे तसेच कर्मचारी डी. एन. पाटील, एस. एस. पाटील, भूषण परदेशी आणि नितीन पाटील यांनी सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध मद्यनिर्मिती, हातभट्टी, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा अवैध धंद्यांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करणे शक्य होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button