Other

मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात : ट्रॅव्हल्स-ट्रक धडकेत दोन ठार, २० जखमी

मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात : ट्रॅव्हल्स-ट्रक धडकेत दोन ठार, २० जखमी

मुक्ताईनगर | ४ जून – राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगरजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जळगावहून अकोल्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघात घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button