HealthSocial

निमखेडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम; औषधांचे वितरण, शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन

निमखेडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम; औषधांचे वितरण, शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन

जामनेर, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासह आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी निमखेडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत योजनेसह अन्य शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत आणि त्यांना उपलब्ध आरोग्यसेवांची माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता

या शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद उद्धव आठवले, प्राध्यापक डॉ. विपुल शिलाहार, डॉ. टोमर, डॉ. रोशनी ललवानी, डॉ. सानिका राय तसेच सह-इंटर्न्स यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच पल्लवी सतीश पाटील, दत्तात्रय वसंत पाटील, रंजना दत्तात्रय पाटील, लोटूबा वसंतराव पाटील, सतीश हरिदास पाटील आणि कृष्णा पाटील यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button