Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्यात वाढ तर चांदीत तब्बल ३ हजाराची उसळी

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोनं-चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीत तब्बल ₹३,००० ची उसळी नोंदवली गेली आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०१,६७०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,११,००० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,३२,५०० वर पोहोचला असून, कालच्या तुलनेत ₹३,००० ची थेट वाढ झाली आहे.
सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिरावले होते, परंतु आज पुन्हा वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीत आलेली झपाट्याची उसळी गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. दररोजच्या बदलत्या दरामुळे बाजारात खरेदी-विक्रीची चळवळ वाढत असून, ग्राहक सोनं-चांदी खरेदीसाठी अधिक उत्सुकतेने सराफ पेढ्यांकडे वळत आहेत.
भंगाळे गोल्डमध्ये शुद्धतेची हमी, आकर्षक दागिन्यांचे डिझाईन्स आणि सर्वोत्तम ऑफर्समुळे ग्राहकांचा विश्वास नेहमीच दृढ राहिला आहे.





