महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. हनुमंत लुंगे, सचिवपदी राजेश जाधव

महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. हनुमंत लुंगे, सचिवपदी राजेश जाधव
अमरावती, दि. ६ : महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनची वार्षिक सभा अमरावती येथील अरुणोदय ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात डॉ. वसंत लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी असोसिएशनच्या नूतन राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेस राज्यातील संलग्न जिल्हा संघटनांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. हनुमंत लुंगे (अमरावती) तर सचिवपदी राजेश जाधव (जळगाव) यांची निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर पाटील (नाशिक) यांची निवड झाली.
उपाध्यक्षपदी कैलास करवंदे (बुलढाणा), डॉ. सुनील पंढरे (बीड), अशोक परीट (लातूर), प्रवीण कुपटीकर (नांदेड) आणि निलेश भगत (यवतमाळ) यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी डॉ. वसंत लुंगे (अमरावती) यांची निवड करण्यात आली.
सहसचिवपदी डॉ. हरीश काळे (अमरावती), उदयराज कळंबे (रत्नागिरी) आणि प्रमोद खरात (जालना) यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. सुगंध बंड (अमरावती), दिनेश धारपवार (वाशिम), अमन डोमाले (पुणे), गिरीश काळे (अकोला), योगेश सोनवणे (जळगाव), रामेश्वर हराळे (पिंपरी-चिंचवड) आणि आशिष जगताप (बीड) यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल राज्यभरातील डॉजबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून राज्यात डॉजबॉल खेळाच्या विकासासाठी नवी कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.






