महागणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे जळगाव मध्ये आयोजन


महागणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे जळगाव मध्ये आयोजन
जळगाव, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महागणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगीत, गायन, वादन व नृत्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉ श्रीमंत हारकर यांनी केले. यावेळी नगरसेवक राजेंद्र घुगे,डॉ.विरेंद्र खडके, श्रीमती अनिता भापसे, उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे, आदी उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व, लोककला व परंपरांचे जतन तसेच ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आणि ‘bappa.org’ या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात बालकलाकारांसह स्थानिक कलाकारांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती, बंधुभाव व सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी श्रीराम गुरुकुलम व डॉ वैभव मावले या संस्थेच्या कलाकारांनी विविध कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रम प्रेमी नागरिक, कलाकार, विद्यार्थी उपस्थित होते.







