Other
शेख मसूद यांचे निधन, आज अंत्यविधी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात असलेल्या आलमीन अपार्टमेंट येथील रहिवासी शेख मसूद यांचे दि.९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.१० रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते कय्यूम नवाज यांचे लहान बंधू आणि पत्रकार जकी अहमद यांचे मामा होत.







