Politics

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश  महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश  महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर जळगाव शहरात प्रथम आगमन होताच त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचंड उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात गिरीश भाऊंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गिरीश भाऊंचे आगमन होताच घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह, पुष्पवृष्टी आणि जल्लोषामुळे रेल्वे स्थानक परिसर अक्षरशः उत्सवस्थळ बनला होता.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गिरीश भाऊ महाजन यांना भव्य गुलाबहार घालून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पुष्पगुच्छ देत गिरीश भाऊंना शुभेच्छा दिल्या.

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत गिरीश भाऊ महाजन यांचे नेतृत्व सातत्याने महत्त्वपूर्ण राहिले आहे. जळगाव जिल्ह्यासोबतच आता नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. “गिरीश भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी भाजप पश्चिम महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, अरविंद देशमुख, सुरेखा तायडे, गायत्री राणे, विशाल भोळे, राजेंद्र घुगे पाटील, महानगर सचिव विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गिरीश भाऊंवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जळगावात झालेल्या या भव्य स्वागताने गिरीश भाऊ महाजन यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. रेल्वे स्थानकावरील उत्स्फूर्त गर्दी, घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे गिरीश भाऊंचे जळगावातील आगमन संस्मरणीय ठरले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button