Social

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

प्राचीन ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी उपयोग करण्याचे डॉ. हर्षल बोरोले यांचे आवाहन

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

प्राचीन ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी उपयोग करण्याचे डॉ. हर्षल बोरोले यांचे आवाहन

जळगाव, : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद ही भारताची प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रशुद्ध वैद्यकीय परंपरा असून, निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंधक उपाय आणि आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने आयुर्वेदाचे योगदान महत्त्वपूर्ण असून प्राचीन परंपरा आणि आधुनिक काळातील आयुर्वेदाची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना त्यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या विविध आरोग्यविषयक समस्यांवर प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आयुर्वेदातील जीवनशैलीविषयक तत्त्वे उपयुक्त ठरू शकतात, असेही नमूद केले. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून त्यातील शास्त्रीय ज्ञान आत्मसात करावे आणि समाजामध्ये आयुर्वेदाविषयी योग्य माहिती व जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात आयुर्वेदाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार करून समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button