नवरात्रोत्सवात सोने-चांदी भावात किंचित घसरण; खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदीच्या भावाने काही दिवसांपासून उच्चांक गाठला होता. मात्र, भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजच्या दरांमध्ये कालच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
आजच्या दरांनुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०३,६९०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१३,२०० इतके झाले आहे. हे दर कालच्या तुलनेत सुमारे ₹१,००० नी कमी झाले आहेत. दरम्यान, चांदीचा दर ₹१,३६,००० प्रति किलो इतकाच कायम असून, चांदी स्थिर राहिली आहे.
दर घसरले असले तरी सणासुदीचा माहोल, आगामी दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता खरेदीची लगबग बाजारपेठेत सुरूच आहे. पारंपरिकरीत्या या हंगामात सोनं-चांदी खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे ग्राहक दालनांकडे आकर्षित होत आहेत.
भंगाळे गोल्डमध्ये उत्सवी ऑफर्स, आकर्षक योजना, पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स आणि शुद्धतेची हमी यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. जळगाव आणि सावदा येथील दालनांमध्ये रोजच खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे.



