Other

जळगावात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

जळगावात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

११ जुलै रोजी महादेव हॉस्पिटलमध्ये हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

जळगाव | प्रतिनिधी : हृदयविकाराने त्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार (एम.डी., डी.एन.बी. कार्डिओलॉजी) यांची नियमित मासिक ओपीडी आता जळगाव येथे सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आकाशवाणी चौक, विद्यानगर, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रुग्णांची तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत.

११ जुलै रोजी विशेष ओपीडी

या महिन्यातील विशेष ओपीडी शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच जन्मजात हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. परिहार हृदयविकारावरील आधुनिक उपचारांमध्ये विशेष प्राविण्य लाभलेले आहेत.

विविध हृदयविकारांवर तपासणी

या ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, घबराट, हार्ट अटॅकची शंका, थकवा, हात-पायांना सूज, बेशुद्ध पडणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशा विविध तक्रारींवर तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

बालहृदयरोगासाठीही सुविधा

बालकांमधील जन्मजात हृदयरोगांचे निदान करण्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध आहे. वारंवार सर्दी-खोकला, न्यूमोनिया, दूध पिताना घाम येणे, वजन न वाढणे, खेळताना दम लागणे किंवा मूल निळे पडणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता पालकांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अत्याधुनिक उपचार सुविधा

महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अॅडल्ट व पेडियाट्रिक २डी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, होल्टर मॉनिटरिंग, कोरोनरी व पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर प्रत्यारोपण, डिव्हाईस क्लोजर, बलून व्हॉल्व्होटॉमी तसेच बायपास व ओपन हार्ट सर्जरीच्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रुग्णांनी पूर्वनोंदणी करून वेळेवर तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१७०४०५० आणि ७०२०३७८५१८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button