Crime

ब्रेकिंग : मैत्री, ड्रग्स आणि ब्लॅकमेलिंगचा थरार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात एका १८ वर्षीय तरुणीने गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली असून, मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवून व्यसनाच्या आहारी लावणे, अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकावणे, वारंवार लैंगिक शोषण करणे, घरातून पळवून नेणे तसेच अमली पदार्थ पुरविल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही जळगाव शहरातील रहिवासी असून शिक्षण घेत आहे. शालेय जीवनात झालेल्या ओळखीमधून एका तरुणीसोबत तिची मैत्री झाली होती. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क वाढला. संबंधित मैत्रिणीमार्फत तिची एका तरुणाशी ओळख झाली.

अश्लील फोटो काढून लैंगिक शोषण
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला सिगारेट, मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करण्यास तिला प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच काळात तिच्या नकळत अश्लील व नग्न छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पळवून नेल्यावर मित्राने केला विनयभंग
तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने धमकी देऊन तिला घरातून पळवून नेले होते. काही काळ ती आरोपीच्या निवासस्थानी राहिल्यानंतर पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतली. त्यानंतरही आरोपीकडून संपर्क साधून दबाव टाकला जात असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दरम्यान, आरोपीच्या एका मित्राने सोशल मीडियावर अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवून विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच आणखी एका व्यक्तीने अमली पदार्थ घरापर्यंत आणून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरसेवकाची चौकशी
या प्रकरणी फिर्यादीने जळगावातील प्रजापत नगर येथील निर्मल दिनेश तिवारी, शिवकॉलनी येथील जय चौधरी तसेच गौरव पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संजय तडवी करीत आहेत. दरम्यान, गुन्ह्यात निर्मल तिवारी यांचा मित्र असलेल्या जळगाव शहर मनपातील एका नगरसेवकाची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button