Social

आरोग्य विभागातर्फे मुकुंद गोसावी रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

आरोग्य विभागातर्फे मुकुंद गोसावी रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

जळगाव : आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता सामाजिक आणि आरोग्य सेवेत निरपेक्षपणे योगदान देणारे रक्तमित्र मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते त्यांना ही निवड पत्र प्रदान करण्यात आली.

सध्या जिल्ह्यात मिशन सिंदूर उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरांचे आयोजन सुरू असून, रक्तसाठा मुबलक ठेवण्यासाठी प्रशासनासोबत आरोग्य विभागही सक्रिय आहे. तप्त उन्हाळ्यात थैलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षयग्रस्त रुग्ण आणि प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या मातांसाठी नियमित रक्ताची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर मुकुंद गोसावी यांचे कार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे.

गोसावी हे नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात आणि स्वतःही वेळोवेळी रक्तदान करत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक वेळा रक्तदान केले असून, त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही रक्तदानाबाबत जागरूकता वाढली आहे.

कोरोना काळातही त्यांनी दिव्यांग मोटारसायकलच्या साहाय्याने जीवाची पर्वा न करता अनेक गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. कोरोना लसीकरण मोहिमेतही त्यांनी स्टार प्रचारक म्हणून उल्लेखनीय भूमिका बजावली होती.

आरोग्य विभागाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची रक्तदान जनजागृती ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून झालेली निवड समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button