Social
खेडमध्ये आज मानवाधिकार संरक्षण विषयक मोर्चा

खेड : बांगलादेशातील अल्पसंख्याक व हिंदूवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित आणि हिंसक अत्याचार थांबावेत यासाठी जागतिक मानवाधिकार दिनी येथील विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. मानवाधिकार संरक्षण विषयक मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चास प्रारंभ होईल सकाळी ९ ते ११ या वेळेत दुकाने व व्यवसाय बंद ठेवून मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.