Social

लाड-पांगे समिती’च्या शिफारशी व शासन परिपत्रकानुसार तातडीने नियुक्ती व प्रलंबित लाभ देण्याची मागणी

लाड-पांगे समिती’च्या शिफारशी व शासन परिपत्रकानुसार तातडीने नियुक्ती व प्रलंबित लाभ देण्याची मागणी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेतील निवृत्त, स्वेच्छानिवृत्त व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी वारसहक्काच्या नोकरीसह प्रलंबित निवृत्तीवेतन आणि इतर आर्थिक लाभ तातडीने देण्याची मागणी उपमहापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार वारसहक्काच्या नियुक्तीची प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करूनही अनेक महिन्यांपासून नियुक्ती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वारसांनी सांगितले की, अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अद्याप निवृत्तीवेतन सुरू झालेले नाही. तसेच स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती किंवा कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर वेतन बंद झाल्याने कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रलंबित आर्थिक लाभही अद्याप मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यामुळे शासनाच्या निर्देशांनुसार वारसहक्काच्या नियुक्त्या तातडीने देण्यात याव्यात, तसेच निवृत्तीवेतन व इतर सर्व प्रलंबित लाभ तत्काळ अदा करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर विजय हिरालाल कागडे, जितेंद्र चरण सारखान, रविन लाभण ढेडवाल, कपील किशोर सकत, रणजित प्रकारा रतनकत, माधुरी विक्की हसकर, ललित हिरालाल काराडे, धीरज शिवप्रकाश ढढोरे आणि राजतिलक जंगन चनाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button