बांबरुड बुद्रुक येथे समृद्ध पंचायत सशक्तिकरण अंतर्गत स्वच्छता मोहीम अभियान

बांबरुड बुद्रुक येथे समृद्ध पंचायत सशक्तिकरण अंतर्गत स्वच्छता मोहीम अभियान
भडगाव -प्रतिनिधी आज रोजी बांबरुड बुद्रुक येथे महाराष्ट्र शासनाच्या समृद्ध पंचायत सशक्तिकरणअभियानांतर्गत स्वच्छता मोहीम वार सोमवार रोजी राबवीण्यात आली याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला
या अभियान अंतर्गत दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचे धोरण शासकीय स्तरावर झाल्याने स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवले आहे या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य एस. डी. खेडकर अण्णा, बाळासाहेब पाटील, उपसरपंच दीपक कोळी, अनिल पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनिल वाघ, प्रदीप पाटील, सुभाष पाटील,नत्थू पाटील, विश्वास पाटील, भगवान जाधव, योगेश बाविस्कर,उमेश उमेश भिल्ल, यांच्यासह ग्रामसेवक आर बी पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.






