Social

पंचक्रोशीत घुमला सम्राट अशोकाचा जयजयकार

सम्राट अशोक सामाजिक संघाचा उपक्रम

पंचक्रोशीत घुमला सम्राट अशोकाचा जयजयकार
सम्राट अशोक सामाजिक संघाचा उपक्रम
सुभाष धाडे मुक्ताईनगर : अखंड भारताचे चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची जयंती कुऱ्हा – वढोदा – डोलारखेडा परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी झाली. अशोक सामाजिक संघाच्या वतीने सम्राट अशोक जयंती संपूर्ण पंचक्रोशीत व्यापक स्वरूपात साजरी केली. यानिमित्त मौजे डोलारखेडा ते वढोदा अशी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. १४५ मोटारसायकली वर स्वार होऊन तीनशे कार्यकर्ते सम्राट अशोकांचा जयजयकार करत परिसरातील गावातून मानवतावादी व जनकल्याणकारी विचार समाजात रुजवत फिरले. डोलारखेडा येथे सकाळी साडे दहा वाजता सम्राट अशोकांच्या प्रतिमेचे पूजन झाले. याठिकाणी रवींद्र हिरोळे, अशोक निकम, शंकर इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नांदवेल, चिंचखेडा बु. वायला, टाकळी, महालखेडा, निमखेडी बु. चारठाणा, बोदवड, धामणगाव, बोरखेडा, कुऱ्हा, पारंबी, तालखेडा, चिंचखेडा खु. वढोदा आणि इतर गावांतील चौका चौकातून प्रतिमेची रॅली काढुन महान सम्राट अशोकांना मानवंदना देण्यात आली. सकाळी सुरू झालेली रॅली सायंकाळी सात वाजता विसर्जीत झाली. रॅलीचा समारोप वढोदा येथील बुद्ध विहारावर झाला.  यावेळी सूत्रसंचालन ऍड. राहुल लहासे यांनी केले. तर रवींद्र हिरोळे, अशोक निकम, गणेश तायडे यांनी विचार मांडले रॅली यशस्वीते साठी अशोक निकम, ऍड. राहुल लहासे, शिवाजी वानखेडे, सिद्धार्थ थाटे, अनिल वाघ, राजू थाटे, अतुल खंडारे, विजय इंगळे,  सुनील तायडे, राजू इंगळे, जितेंद्र वानखेडे, अजय निकम, गौतम वाघ, बाळू झनके, प्रमोद इंगळे, राहुल इंगळे, प्रवीण दामोदरे, सुनील खराटे, अनिल बडगे, विनोद मोरे, सतीश हिरोळे, मिलिंद इंगळे, येडू वाघ, सिद्धार्थ पाटोळे, अतुल हिरोळे, प्रशांत हिरोळे, दीपक हिरोळे, राहुल रोटे, पंकज रोटे, प्रकाश रोटे,  नवराज तायडे, सावळे, राजू वानखेडे, लखन मोरे, गौरव हिरोळे, राजू निकम, विनायक हिरोळे, सुपराव गवई, अश्विन गवळे यांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button