Other

जिल्हाधिकारी कार्यालयातील गट ‘क’ संवर्गातील १२८ कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली प्रक्रिया पूर्ण

जिल्हाधिकारी कार्यालयातील गट ‘क’ संवर्गातील १२८ कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली प्रक्रिया पूर्ण

प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापनातून नागरिकांना अधिक दर्जेदार व वेळेवर सेवा मिळणार
जळगाव – जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या प्रक्रियेत एकूण १२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदली प्रक्रियेमध्ये सहायक महसूल अधिकारी – ४९, मंडळ अधिकारी – ८, महसूल सहायक – ४६, ग्राम महसूल अधिकारी – १९ आणि वाहनचालक – ६ अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
ही बदली प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या प्रक्रियेमुळे जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचे संतुलित व प्रभावी व्यवस्थापन होणार असून, महसूल विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्यास मदत होईल.
तसेच विविध कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध झाल्याने नागरिकांना महसूल विषयक सेवा अधिक दर्जेदार, कार्यक्षम आणि वेळेत उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
***********

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button