OtherSocial

जळगाव पोलीस दलाचा गौरव : पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर, वाचा यादी..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना सन २०२५ या वर्षासाठीचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलीस उप अधीक्षक ते पोलीस नाईकपर्यंत २८ जणांनी मानाचे स्थान पटकावले आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातून पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब बाळासाहेब घोलप यांना या मानाच्या सन्मानचिन्हाने गौरवण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच जिल्हयातील एकूण नऊ सहायक पोलीस उप निरीक्षकांनाही हा बहुमान प्राप्त झाला आहे. यामध्ये भरतसिंग प्रल्हाद पाटील, दिलीप मेघराज जाधव, शामकांत दिनकर सोनवणे, सलिम खान बशारत खान, मिनाक्षी दिलीप सावळे, सखाराम छबूराव सकट, अफजल युसुफ खान, विठ्ठल शंकर फुसे आणि रविंद्र सर्जेराव गायकवाड या अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हवालदार, पोलीस नाईक यांचा समावेश
यादीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक अनिल भाऊराव चौधरी, सलीम शेख मुसा पिंजारी, हवालदार मनोज शिवाजी गायकवाड, अशोक दौलत अहिरे, संदिप रमेश पाटील, किरण निंबालाल धमके, विद्या हरिलाल पाटील, विजय बळीराम नेरकर, संदिप भिकन पाटील, राहुल भिमराव सोनवणे, सुरज मधुकर पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर, विजय गोरखनाथ पाटील, अकरम याकुब शेख, इरफान यासीन मलिक यांच्यासह पोलीस नाईक अश्विन साहेबराव हडपे, अतुल संतोष चौधरी, सचिन रमेश सोनवणे, संदीप अशोक नन्नवरे यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र दिनी होणार सन्मान
सर्व सन्मानितांनी पोलीस दलातील विविध प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक व शौर्य पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांना हे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. या यशाबद्दल पोलीस महासंचालकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उद्या होणाऱ्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात या सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button